मन, मेंदू आणि मी

मी सकाळी उठतो. उशीर झालेला असतो. मी पटापट आवरण्याचा प्रयत्न करीत असतो. पण मन मात्र भलतीकडेच. मी दाढी करायला आरशात पाहतो. आणि मन आरशात तिला. ‘बस’ला उशीर होत असतो. आणि मन मात्र तिला कोणता ड्रेस आवडेल ते सांगत असते. पण लगेच मेंदू हटकतो. मी आवरून धावपळ करीत बससाठी स्टॉपवर जातो. तिथे ‘परीवहिनी’ येतात. मी ‘परीवहिनी’कडे पाहतो त्याही हसून माझ्याकडे. पण मन तीच्या स्वप्नात. तिथेही तीच असल्याचा भास होतो. मी हरखून पहात असतो. बसमध्ये बसतो. मोबाईलचे हेडफोन कानाला लावून गाणी सुरु करतो. मन प्रत्येक गाण्यात तिचाच भास करते. मला तिची आठवण येत असते. कंपनीत उतरतांना मन प्रश्न विचारते ‘ती आजारी तर नाही ना? मग ती का नसेल आली दोन दिवस? की घरी गेली’. मेंदू उत्तरतो ‘तुला काय गरज नसत्या चौकशा’. मी खिन्नपणे इमारतीच्या जिन्यातून चाललेलो असतो. Continue reading

Advertisements

हे मित्र ना..

हे मित्र ना, काय करतील देव जाणे. आज दुपारी कॅन्टीनमध्ये चक्क ती ज्या रो मध्ये बसलेली तिथे जागा पकडली. हुश्श! हालत खराब झाली होती. आज सकाळी मला ती उदास वाटत होती. म्हणजे, तिचा चेहरा. मी माझ्या मित्राच्या डेस्कजवळ उभा असतांना ती तिच्या मैत्रिणीसोबत पाणी आणायला चाललेली. त्यावेळी तीला मी पहिले. पण.. सोडा. आज दुपारी, जेवायला जातांना पुन्हा मित्रांचे नखरे. तरीही हो नाही करीत आले नवीन कॅन्टीनला. पण मी कॅन्टीनमध्ये गेलेलों, तेव्हा ती नव्हती. मग विचार आला, ती जुन्याच कॅन्टीनमध्ये असेल तर. मित्रांना म्हटलं आता आपण जुन्या कॅन्टीनला जावू. अस म्हटल्यावर सगळेच चिडले. Continue reading

मस्त

काय सांगू आणि काय नको अस झालं आहे आता. कालचा तो दिवस. दिवस कसला स्वप्नंच. परवाचा दिवस आणि ती रात्र. रात्री असली चित्रविचित्र स्वप्न पडली ना. असो, नीट झोपच आली नाही. काल सकाळी उठलो तरी सर्दी आणि डोकेदुखी कमीच होईना. व्यायाम करतांना खुपंच हाल झाले. शेवटी अर्धवट व्यायाम सोडला. सुट्टी घ्यावी अस मनात येत होते. पण गेलो तसाच. दाढी सुद्धा नाही केली. एकतर आधीच अशक्तपणा, त्यामुळे काळवंडलेला चेहरा आणि बिनदाढीचा. आणि ते बंडल कपडे. थोडक्यात ‘अवतार’ झालेला माझा. तसाच गेलो. डेस्कवर बसल्यावर ती ऑनलाईन आहे का ते पहिले. तर ती आलेली. खर तर काल मी तिला ‘गुड मोर्निग’चा मेल टाकायचे ठरवलेले. पण पिंग केले. सोडा, मी पण काय पान्हाळ लावत बसलो आहे. Continue reading

सुगंध

आता ‘बूट’ला मराठीत काय म्हणतात माहित नाही. मराठी भाषेत ‘पादत्राणे’ अस म्हणतात की काय? की ‘पादुका’? अस काही तरी म्हणत असतील. किती महत्वाचे असतात याची जाणीव आज होते आहे. जर ते चांगले असतील तरच.. नाहीतर आज मी तेच अनुभवतो आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे ‘न’ पॉलिश केलेल्या. आणि न धुतलेले मोजे घालून माझी स्वारी आज सकाळी घरातून निघाली. Continue reading

शोधू मी..

कुठे गेली यार ती! मी ना इतक्या ‘गाढवचुका’ करतो ना. माझा मलाच राग येत आहे. सकाळी ती कॅन्टीनमध्ये दिसली होती. आणि एकटी बसली होती. पण नेहमीप्रमाणे मी हिम्मतच नाही करू शकलो तिच्याशी बोलायची. आणि नंतर ती पुन्हा कुठे गायब झाली कुणास ठाऊक! अजूनही परतली नाही. मला खूप टेन्शन आल आहे. यार काय करू? डोके खूप दुखते आहे. सकाळपासून तिच्या डेस्ककडे पाहतो आहे. आज सुद्धा ती खूप छान दिसत होती. बोललो असतो तर काही फरक पडला नसता. आता दोन दिवस कसे जाणार? खरंच काही सुचेनासे झाले आहे. Continue reading

अप्सरा आली

आज सकाळी तिच्याशी बोललो. हुश्श! श्वास सोबतच देत नाही आहे. किती वाट पाहायला लावली तिने. चार दिवस! जातच नव्हते. काय सांगू? आज तिची ओढणीचा आणि माझ्या शर्टचा रंग एकच आहे. खूप छान वाटले. बोलतांना अस वाटत होते की, जवळपास चार वर्षांनी भेट झाली. आज ज्यावेळी ती सकाळी आली त्यावेळी नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. कॅन्टीनमध्ये जाऊन आल्यावर तिच्या डेस्कपासून जातांना ती माझ्याकडे पाहत होती. मग केली हिम्मत बोलायची. आज पण ती किती छान दिसते आहे. यार, मी तिच्याबद्दल बोलण्यापेक्षा तीच माझ्या बद्दल विचारात असते. नेहमी मी कुठे राहतो हे विचारते. Continue reading

दिवाना

चित्रपटाचा नायक आनंदात सकाळी कंपनीच्या बसने कंपनीत चाललेला असतो. पावसाच्या सरीने वातावरण अधिकच रोमेंटिक बनवले असते. त्यात नायक नायिकेच्या आठवणीत, तिला भेटण्याची त्याची इच्छा. खुपचं अधीर झाला असतो तो. तिच्यासाठी तो ‘दिवाना’ झालेला असतो. कंपनीत पोहचल्यावर, त्याच्या डोक्यात आज नायिकेशी कस बोलावं अगदी, तिला काय म्हणावं असे सगळे विचार त्याला गोंधळून टाकत असतात. कंपनीत आल्यापासून त्याला तिची आठवण इतकी सतावत असते की सारखा सारखा तिच्या बसण्याच्या जागी दर पाच दहा मिनिटांनी पाहत असतो. पण नायिका काही येत नाही. Continue reading