इलेक्शन कार्ड

यावेळचा दसरा मी गावी साजरा केला. काल नगरमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. परवाच वडिलांनी मला माझे निवडणुकीचे आलेले ओळखपत्र दिले. ते बघून असे वाटले की, फोटो कॉपी करून दिले असावे. लेमिनेशन तर एकदम फालतू. थोड ओढलं कि, निघून येईल. बर त्यातलं छायाचित्र ब्लाक अन्ड व्हाईट. मी तर रंगीत छायाचित्र जोडलं होत त्या फॉर्मला. माझ नाव, वडिलांचं नाव ठीक. पत्ता देखील बरोबर. पण जन्म वर्ष चुकीचे. बर वडिलांचे ओळखपत्र तर काही विचारूच नका. नावात गोंधळ. आडनाव ‘आठल्ये’ च्या एवजी ‘आढळले’. बाकी पत्ता ठीक होता. आईच जुनंच कार्ड असल्याने ते ठीक होत. वडिलांनी थोड्या चुका दुरुस्त करण्यासाठी दिलं होत. ते अधिक चुका होऊन आल होत. Continue reading

Advertisements

साडेसाती

माझे आई आणि वडील भविष्य, ज्योतिष शास्त्राला मानतात. आज रात्री माझी आई म्हणाली की तुझी आजपासून साडेसाती संपली. आता त्यांच्या मते मागच्या काही वर्षांपासून ज्या अडचणी मला येत होत्या त्याचे मूळ कारण साडेसाती हे होते. मध्यंतरीपासून मला आर्थिक अडचणी अनेक येत आहेत. म्हणजे मला माझी मिळकतीपेक्षा अधिक खर्च होत आहे. आता मी फालतू खर्च काहीच करत नाही. तरीदेखील असे होते. आता साडेसाती किंवा भविष्य यामुळे मला अशा अडचणी येत आहेत अस मी मानत नाही. घर घेतल्यापासून माझ्या मिळकतीतील एक मोठा हिस्सा लोनच्या हप्त्यात जातो. दुसर म्हणजे मी करत असलेली इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक. आणि हो मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सरकार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे खर्चच खर्च होत आहे. त्यामुळे मानसिक ताण तणाव निर्माण होतात. Continue reading