१००

आज फ्लूने शतक केल पुण्यात. आता सचिनने देखील केल म्हणा. कदाचित शंभर म्हटलं की क्रिकेटच आठवेल. पण पुण्यात सावळा गोंधळ चालू आहे. आता मी काही त्या हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांचा प्रतिनिधी नाही, की ‘फ्लू का आतंक’ म्हणायला. पण सुरवात आणि शतक पुण्यातच घडल. मुळात त्या स्वाइन फ्लू बद्दल काय बोलाव तेच कळत नाही. ना त्यावर योग्य उपाय ना लोकात जागरुकता. प्रत्येक जण तोंडाला रुमाल बांधून फिरतो. पण रुमाल बांधल्याने फ्लू होणारच नाही अस नाही. सरकारला तर काही बोलून फायदाच नाही. पालिका फ़क़्त आम्ही हे केल आणि ते केल्याच्या गप्पा. निष्पन्न काहीच नाही. लोक आपली मरतच आहे. बर गेलेल्यांपैकी काही कधीही घराबाहेर न पडलेल्या आहेत. Continue reading

Advertisements

पुन्हा ही चूक घडणार नाही

मागील दोन दिवसांपासून मी सर्दी आणि तापाने आजारी पडलो होतो. पण चिंतेचे आता काही कारण नाही. आज सकाळी ताप असल्याने मी कंपनीत काही गेलो नाही. परवा मी जेव्हा पुणे विद्यापीठातून येत होतो त्याचवेळी शंका आली होती. कारण मला कधी नव्हे एवढा थकवा जाणवला होता. बॉसला सुट्टी मागताना खर तर खूप लाज वाटत होती. पण तरी देखील मी फोन करून सुट्टी मागितली. आणि त्याने मोठ्या मनाने दिली देखील. अख्खा दिवस झोपून काढला. काल पण खर तर तेच केल होत. काल रात्री ताप उतरला होता. पण सकाळी पुन्हा आला होता. असो आता फ़क़्त डोक दुखत आहे. माझ्या या तापामुळे अनेकांची तशी डोकेदुखी झाली. आई तर काही विचारू नका. तिला तर काय करू आणि काय नको अस झाल होत. Continue reading

काळजीपेक्षा भीतीच जास्त

मागील दोन दिवसांपासून मला थोडी सर्दी आणि खोकला झाला होता. मला सहसा आजार होत नाहीत. पण यावेळी मात्र सर्दी झाली आणि त्यानंतर खोकला. आईच काही विचारू नका. मी काही म्हटलं नाही तरी मेडिकल मध्ये जाऊन व्हिक्स, दोन पांढऱ्या रंगाच्या गोळ्या आणल्या आणि घे म्हणाली. आता तिच्याशी काही वाद घालण्यात काही फायदा नव्हता. बर मी काल घेतो म्हणालो आणि सकाळी विसरलो. तर आईने ताबडतोप माझ्या वडिलांना फोन करून सांगितले. मग काय सकाळी सकाळी वडिलांचा फोन ओषधे घे म्हणून. त्यांना मी घेतो म्हटल्यावर त्यांनी फोन ठेवला. बर सकाळी कंपनीत आलो तर माझा सिनिअर आला नव्हता. चौकशी केल्यावर कळले की, त्याची मुलगी पलंगावरून खाली पडली. आणि आता हॉस्पिटल मध्ये आहे. पलंगावरून पडल्यावर हॉस्पिटलमध्ये? अस विचारल्यावर कळले की त्यानंतर तिने उलट्या करायला सुरवात केली म्हणून हा आपला डॉक्टरकडे घेवून गेला. Continue reading