मामा तुपाशी आणि भाचा उपाशी

सध्याला पुण्यात सभाच सभा होत आहे. सगळ्यांनाच पुण्याला यायला आणि भाषणाला वेळ मिळतो आहे. राहुल गांधी सोडून. राहुल गांधी आले. पुढे काय झाले तर ‘हाय आणि बाय’. जाऊ द्या ‘बडे लोग बडी बाते’. नंतर बोलू त्या विषयावर. नासाने चंद्रावर स्फोट घडवून आणले आहेत. चंद्रावर पाणी कुठे आहे, ते शोधण्यासाठी. आता नासाचा निर्णय घेण्यामागे काही ना काही तथ्य असेलच. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला. खूप मोठी कामगिरी केली. आपला भारतपण ना एक प्रश्नचिन्ह आहे. एका महिन्या आधीपर्यंत पुण्यात पाणी कपात चालू होती. एक वेळ तर अशी आली होती की पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उरला होता. कोल्हापुरात तर पाऊस पडावा यासाठी काही लोकांनी यज्ञ देखील केले. शेवटी पाऊस पडला. आता ठीक आहे. पाणी पूर्वीसारखे येते आहे. Continue reading

Advertisements

माझी बडबड

मी बडबडा आहे. खूप गप्पा करतो. बहुतेक सगळे मला बघून पकाऊ आला अस मनात म्हणत असतील अस वाटतं. काल कंपनीत दुपारी माझ्या काही सहकारींशी मी बोलत होतो. पण त्यांचे माझ्याशी गप्पा मारण्यात काही रस आहे अस दिसलं नाही. त्या आपल्या पीसीत डोक घालून आपआपल काम करत होत्या. संध्याकाळी लोकलमध्ये माझ्या मित्राशी बोलायला गेलो तर त्याने लगेचच दुसरीकडे तोंड केल. नंतर तो स्वतहून बोलला. पण त्याच्या वागण्याने माझा अडवाणी झाला होता. अस माझ्याबरोबर आधी खूप वेळा घडल आहे. पण आज प्रथमच मला जाणवलं. नंतर मी काही परत त्यांच्याशी गप्पा मारल्या नाहीत. Continue reading

म्हणे मी अकौंट चेक करतो

सहकारणी उवाच. काल नेहमीप्रमाणे कंपनीत मी काम करत होतो. बाईसाहेब दहा दिवसांनी उगवल्या. आल्या आल्या माझ्या एका सहकारणीला जाऊन माझ्याबद्दल आपल्या मनातील बरच काही बोलल्या. बर मला समजल्यावर मी तीला (बाईसाहेबांना) विचारलं. मी तुझ्या संगणकावर एकदाच बसलो होतो. आणि मी कधीच तुझ जीमेल उघडले नाही. बाईसाहेबांची नवीनच कथा. मला तुझ्या सिनिअरने फोन करून सांगितले. तीच्या म्हणण्यानुसार त्याने मी तीच्या पीसीवर बसून तीचे जीमेलचे अकौंट चेक करताना बघितले. आता माझा सिनिअर गेला आहे ममताला भेटायला. बहुतेक ‘कोलकाता ते पुणे’ अशी नवी एक्स्प्रेस सुरु करा म्हणतो की काय देव जाणे. त्याच्यावर आपण नंतर बोलू. बर माझी पायलीची पन्नास अकौंट आहेत. बर तीच चेक करायला मला जमत नाही. आणि ही सांगते मी तीच चेक करत बसलो होतो. Continue reading

राज इज बुलशेट

परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया जरी उतरली तरी मी तिला आणि तिच्या पक्षाला चांगले म्हणेन. बहुतेक त्याला माझे म्हणणे पटले नाही. तो मला म्हणाला की ‘म्हणजे मराठी बोलणार्याने महाराष्ट्रात राहायचं, बाकीच्यांनी नाही. नाही तर तुम्ही त्याला मारणार’. त्याचा आवाज आणि त्याच्या एकूण राग रंगावरून तो बहुतेक जाम चिडला होता. मला म्हटला ‘सगळे भारतीय आहेत. पण तुम्ही मराठीच्या मुद्द्यावरून वाद घालता. मारहाण करता. ते नेते लोक हिंदू मुस्लीम यात वाद वाढवतात. ते सगळ मतासाठी करतात. मतासाठी आणि सत्तेसाठी मराठी मराठी करतात’. Continue reading

चंपी जयंती

काल रात्री जेवताना माझ्या लहान भावाला मी उद्या सुट्टी आहे का म्हणून विचारलं तर तो नाही म्हणाला. मग त्याने मागील वर्षीचा घडलेला किस्सा सांगितला. तो म्हणाला मागच्या वर्षी दोन ऑक्टोबरला सकाळी रिक्षावाले काका एका मुलाला न्यायला गेले तर त्याचे वडील त्यांना म्हणाले ‘आज चंपी जयंतीची तुम्हाला सुट्टी नाही का?’ असं लहान बंधूराजांनी सांगितल्यावर घरातील सगळेच हसू लागले. काल माझा मित्र म्हणाला उद्या ‘पापा डे’ ला काय करणार? त्याला म्हणालो ‘काय?’ तो म्हणाला की ‘उद्या दोन ऑक्टोबर आहे, आता महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत ना. म्हणून उद्या पापा डे असं म्हणालो’. मला ऐकून हसू फुटले. Continue reading

लग्न का करावे?

काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे मला फोन कर’. काही तरी खूपच महत्वाच काम आहे बहुतेक म्हणून मी तीच्या लहान बहिणीला फोन केला. तर ती म्हणाली की मला नवीन नोकरी लागली आहे. आणि मला संगणकाच्या प्रक्टिससाठी तुझा संगणक हवा आहे. तिला मी म्हणालो की मला आज गावी जायचं आहे. कंपनीतून मी डायरेक्ट निघेन. आणि मंगळवारी येईल. ती म्हणाली पण मला खूप आवश्यक आहे. तू काही तरी मार्ग काढ ना. तीला म्हटलं ठीक आहे. मी संध्याकाळी तुला संगणक देतो. बर म्हणून तिने फोन ठेवला. Continue reading

पुन्हा ही चूक घडणार नाही

मागील दोन दिवसांपासून मी सर्दी आणि तापाने आजारी पडलो होतो. पण चिंतेचे आता काही कारण नाही. आज सकाळी ताप असल्याने मी कंपनीत काही गेलो नाही. परवा मी जेव्हा पुणे विद्यापीठातून येत होतो त्याचवेळी शंका आली होती. कारण मला कधी नव्हे एवढा थकवा जाणवला होता. बॉसला सुट्टी मागताना खर तर खूप लाज वाटत होती. पण तरी देखील मी फोन करून सुट्टी मागितली. आणि त्याने मोठ्या मनाने दिली देखील. अख्खा दिवस झोपून काढला. काल पण खर तर तेच केल होत. काल रात्री ताप उतरला होता. पण सकाळी पुन्हा आला होता. असो आता फ़क़्त डोक दुखत आहे. माझ्या या तापामुळे अनेकांची तशी डोकेदुखी झाली. आई तर काही विचारू नका. तिला तर काय करू आणि काय नको अस झाल होत. Continue reading