ती ती आणि ती

काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय नाही सुचत काही. ती इतकी छान, गोड का आहे? आणि स्वभावाने इतकी प्रेमळ आणि सरळ. तिची खूपच आठवण येत आहे. मला नव्हते घरात करमत. म्हणून आज, मी ऑफिसला आलेलो आहे. Continue reading

Advertisements

अप्सरा नसतांना

यार कधी येणार ती? आता उद्या सुट्टी. म्हणजे झालं. बर आहे. पण कधी येणार ती अस झालं आहे. कितीही बोललं तरी कमीच वाटत तिच्याबद्दल. काल थोडा राग आला होता त्या घासदारांवर. सोडा, पुन्हा तिचा चेहरा आठवला की, राग निघून जातो. काल तिची खूप आठवण येत होती. मग तिची सोशल नेटवर्किंग वरील प्रोफाईल पाहत बसलो. तसे हे देखील रोजचेच चालू आहे. आज ती येणार नाही हे माहिती होत मला. पण तरीही ती असल्याचा भास होतो आहे. येतांना मस्त पावसाच्या सरी येत होत्या. म्हणून मग बस स्टॉपवर लवकर आलो. मस्त वाटत भिजायला. पण खूप लवकर गेला पाऊस. मी साधा भिजलो देखील नाही. पण पावसाच्या सरी आणि ते वातावरण मस्त होते. ती सोबत असती तरी अजूनही छान झाले असते. Continue reading

अ आ ई

आजकाल रोज सकाळी जाग मला तीच्या पैंजणांच्या आवाजाने येते. काय सांगू तिचे ते हसणे! स्वच्छ आणि सुंदर दात. हसतांना पडणारी गालावरची खळी पाहून मनात उठणारे आनंदाचे तुषार पूर्ण भिजवून टाकतात. तिचे बागडणे, हसण्याने रोज माझी सकाळ हसरी असते. ती माझ्या शेजारी रहाते. दिसायला किती छान आहे म्हणून सांगू? त्या दिवशी तिने घातलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस. तिच्यापुढे ऐश्वर्या काय आणि सोनाली काय सगळेच फिके. नेहमी मला तीचा नवीन ड्रेस, नेलपॉलिश किंवा जे काही नवीन घेतले असेल ते दाखवते. नेहमी मी कंपनीत जातांना मला तिचे मान एका बाजूला झुकवून उजव्या हाताने ‘टाटा’ करण्याची पद्धत खूप आवडते. Continue reading

दाखला

दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत त्याच्या कॉलेजात गेलो होतो. त्याने एम.बी.ए करायचे ठरवले आहे. त्यासाठी त्याला हरवलेल्या दाखल्याची नक्कल हवी होती. जातांना मला त्याचा प्राचार्याने आदल्या दिवशीच्या दिलेल्या ‘दाखला का हरवला?’ याविषयावरील व्याख्यानाचा सारांश सांगत होता. आम्ही दोघेही कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याच्या जुन्या आठवणी धरणाचा बांध फुटून वेगाने पाणी पसरावे. तसे याच्या आठवणी आणि किस्से मला सांगत सुटला. मस्त! सगळे इथून तिथून सारखेच असतात. प्राचार्यांनी त्याला आधल्या दिवशी दाखला हरवला म्हणून पोलिसात एफ.आई.आर करायला लावली. आता ह्याच्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांची अख्खी फाईलच हरवली. त्यात तो दाखला देखील गेला. प्राचार्यांच्या केबिनमध्ये आधीच कोणी तरी होते. म्हणून अर्धा तास वाट पहावी लागली. Continue reading

जात

ते म्हणतात ना, जी जात नाही ती ‘जात’. खर आहे. काल पहाटे, (म्हणजे सुट्टीच्या दिवशी माझी पहाट दुपारी बाराच्या पुढे होते) जनगणनेसाठी एक बाई आल्या. माहिती घेत असतांना माझी ‘जात’ विचारली. ‘जात’ सांगितल्यावर बाईंचा चेहरा आणि वागण्यात सुद्धा बदल जाणवला. थोडं बेकार वाटलं मला. अजूनही ‘जातीपाती’ लोक पाळतात. शिक्षक लोक असे ‘जातीवंत’ झाले तर भविष्य अवघडचं आहे. जातीजातींमध्ये अजूनही तेढ आहेत. वरवर दिसून येत नाही पण आतून ‘लाव्हा’ खदखदतो आहे. असो, जनगणना आणि जात यावर मी काय बोलणार? बाळासाहेब जे बोलले तेच माझ मत आहे. Continue reading

कुटुंब

हुश्श !!! काय पटापटा दिवस जात आहेत. मागील महिन्यात सुट्टीला माझे कोकणातील आणि येथील भाऊ बहिण आले आहेत. मज्जाच मज्जा चालू आहे. त्यामुळे वेळच मिळत नाही आहे. मागील आठवड्यात माझे वडील आणि माझा बंधुराज येऊन काल पुन्हा गावी गेले. काय बोलाव आणि काय नाही अस झालं आहे. स्वर्गच उतरलं की काय असा भास होतो आहे. सगळे ‘मिनी आठल्ये’ घरी आहे. असो, मागील काही दिवसात खूप काही घडल. रोज अशा घटना घडल्या की प्रत्येक गोष्ट विस्तृत बोलायची झाल्यास एखादे ‘ईबुक’ बनून जाईल. काही खूप छान घटना घडल्या तर काही खुपंच मनाला बोचणाऱ्या. Continue reading

बँकांची लफडी

सकाळी मित्राचा फोन आला. फोन उचलला तर तो बोलला ‘अरे, आजही बँकेचे काम झाले नाही’. असो, मी फ़क़्त हसलो. कारण आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची बँकांना सुट्टी आहे हे मला माहित होत. त्याच्या सांगण्यावरून मी त्याच्या जळगावच्या नातेवाईकाच्या खात्यात पैसे ऑनलाईन जमा केले. त्याला त्याच्या नातेवाईकाच्या मदतीला दोन तासात पैसे पाठवायचे होते पण ते करायला तीन दिवस लागले. दोन दिवस त्याने दोन तीन बँकेच्या पाच एक शाखांचे उंबरठे झिजवले होते तरी त्याचे काम झाले नाही. आज सुट्टी बघून तो जाम चिडला होता. Continue reading