काकूंची कृपा

आज दुपारपर्यंत तिला एक मिनिट सुद्धा मला ढुंकून बघायला वेळ नव्हता. आणि मी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे. तडफडत होतो. काही नाही. एकदाचं माझ्या बाजूने गेली. पण मला न बघता. आज माझ्या मित्रांसोबत मी कंपनीच्या नवीन कॅन्टीनमध्ये गेलेलो. ती नेहमी तिथे जेवण करते. वाटलं ती तिथे असेल. पण गेल्यावर खूप शोधलं पण ती नव्हती. मग जागा शोधून एका ठिकाणी बसलो. माझ्या एका मित्राने ती आजकाल जुन्याच कॅन्टीनमध्ये जेवते अस सांगितले. मग माझाच मला राग आला. कशाला इकडे तडफडलो अस झालेलं. पण काही उपयोग नव्हता. कारण माझ्या सोबत असलेले दोन मित्र कुपन घेऊन रांगेत उभे होते. Continue reading

Advertisements

बुजगावणे

माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार किंवा खिडकीतून बाहेर. आता मुलींना बुजगावणे म्हणणार नाही. कारण त्यांची ‘बडबड’वरून त्या जिवंत आहेत हे तरी कळते. Continue reading

परीस्पर्श

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर आतमधील लोकांनी मला ही मुख्य इमारतीची बस आहे असे सांगितले. मी आणि ती खाली उतरत असतांना चुकून माझा आणि तिचा ‘स्पर्श’. Continue reading

चुकीचा नंबर

सकाळी सकाळी कंपनीत माझ्या नावाचा फोन आला. कोण आहे म्हणून उचलला तर ‘हेमंत’ मी ‘हो’ म्हणालो तर तिकडून ‘सॉरी’ अस म्हणून फोन कट झाला. परवा देखील असंच. दुपारी फोन आला. आणि माझ्या मित्राने मला दिला. मी फोन उचलला, बहुतेक आजचीच व्यक्ती त्यावेळी ‘आपण मिटींग सुरु करूयात?’ मी माझ्या मित्राकडे बघून कोण आहे असा प्रश्नार्थक चेहरा केला तर त्याने ‘तुझ्याच ग्रुप मधील आहे’ अस म्हणाला. मी ‘बर’ अस म्हटलो. तर पुन्हा तिकडची व्यक्ती ‘काही क्षणासाठी थांब’ अस म्हणाला. मी आपला ‘ठीक आहे’ म्हणून थांबलो. मग विचार केला मिटींगसाठी वही घ्यावी. म्हणून फोन न बंद करता ठेवला आणि माझ्या मेजवरील वही आणली. पुन्हा फोन उचलला तर फोन कट झालेला. मग कळेना फोन कोणी केला होता ते. एक तर त्या आमच्या कंपनीतील फोनवर भलतेच आवाज येतात. कधी कधी ओळखीचा सुद्धा कळत नाही. मग त्या माझ्या मित्राला पुन्हा विचारलं तर त्याने पुन्हा तेच उत्तर दिल. मग काय करावं म्हणून माझ्या त्या सिनिअरला विचारलं तर ती बोलली ‘आज आपली कोणतीही मिटींग नाही’. तिला विचारलं की ‘टीम लीडरने केला असेल का?’ तिने नाही म्हटल्यावर मी माझ्या इथल्या सिनिअराला विचारलं तर ती देखील ‘नाही’ असंच म्हणाली. मग काय जेवतांना देखील फोन कोणाचा असेल अस विचार करत बसलो पण काही उत्तर सापडलं नाही. Continue reading

खेद

संध्याकाळची सात वाजताची पुणे लोणावळा लोकल नेहमी प्रमाणे उशिरा आली. पण आनंदाची गोष्ट अशी कि ह्यावेळी गाडी उशिरा येणार याची सूचना दिली गेली. तीच रटाळ ‘हमे खेद है’ ची आकाशवाणी. पुण्यात लोकल उशाराची सवय सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे कोणीही आजकाल चिडत नाही. घरी आल्यावर पंतप्रधानांनी ‘खेद’ व्यक्त केल्याची बातमी म.टा वर वाचली. चंडीगड येथील पीजीआयएमईआर या हॉस्पिटलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पदवीदान समारंभ मंगळवारी झाला. त्यावेळी हॉस्पिटलच्या आवाराभोवती पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेचे कडे उभारण्यात आले होते. सुमीत वर्मा या किडनी पेशंटला या सुरक्षाव्यवस्थेमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होता आले नाही. पेशंट व त्याच्या नातेवाईकांना दोन तास ताटकळत रहावे लागले. परिणामी वर्मा यांचा गाडीतच मृत्यू झाला. मग पंतप्रधानांनी पत्र पाठवून ‘खेद’ व्यक्त केला आहे. Continue reading

इडियट

इडियट हा शब्द ‘सॉरी’ प्रमाणेच भारतात आला. नाही मी तुम्हाला इतिहास सांगणार नाही आहे. आज दुपारी कंपनीत नेहमी प्रमाणे मी माझ्या सहकार्य बरोबर जेवायला बसलो. आमच्या कंपनीत माझा एक मित्र आहे, म्हणायला तो  ऑफिस बॉय आहे. पण त्याला मी कधीच तस समजल नाही. आणि तो पण कधी तस वागला नाही. त्याचे बोलणे पण तस नाही. नेहमी जेवताना तो त्याच्या डबा तो बाकी सगळ्याना आग्रहाने देतो. त्याच्या मानाने तो तो फारच कमी जेवतो. Continue reading