राज इज बुलशेट

परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया जरी उतरली तरी मी तिला आणि तिच्या पक्षाला चांगले म्हणेन. बहुतेक त्याला माझे म्हणणे पटले नाही. तो मला म्हणाला की ‘म्हणजे मराठी बोलणार्याने महाराष्ट्रात राहायचं, बाकीच्यांनी नाही. नाही तर तुम्ही त्याला मारणार’. त्याचा आवाज आणि त्याच्या एकूण राग रंगावरून तो बहुतेक जाम चिडला होता. मला म्हटला ‘सगळे भारतीय आहेत. पण तुम्ही मराठीच्या मुद्द्यावरून वाद घालता. मारहाण करता. ते नेते लोक हिंदू मुस्लीम यात वाद वाढवतात. ते सगळ मतासाठी करतात. मतासाठी आणि सत्तेसाठी मराठी मराठी करतात’. Continue reading

Advertisements

भाषण का प्रवचन?

१५ ऑगस्टला आपल्या पंतप्रधानांनी दुखी चेहऱ्याने पण जोरात भाषण केले. जाऊ द्या काय बोले त्यावर आपण नंतर बोलू. त्यांनी भाषण हिंदीत केले. पण लिहून आणले गुरुमुखीत. गुरुमुखी हि पंतप्रधानांची मातृभाषा. वाचायला सोपे जावे म्हणून काय कि काय म्हणून आणले असावे. सोनियाजी पण भाषण हिंदीतूनच करतात पण, नेहमी भाषण इटलीत लिहून आणतात. कदाचित त्यानाही वाचायला सोपे जावे म्हणून असेल. आधी मी लहान असताना माझ्या वडिलांच्या म्हणण्यावरून वकृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. कधी नंबर आला नाही. परंतु भाग घ्यायचो. वडील भाषण पूर्ण पाठ करून घ्यायचे. आणि मग मी तिथे जावून बोलून टाकायचो. Continue reading

मला काय त्याचे ?

परवा रात्रि दहाच्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका अपघातात एक युवक ठार झाला. काल सकाळी मी सकाळी कंपनीत येत असताना ती कार बघितली. ती कारने त्या युवकाला उडवून रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्तानाकत, त्या स्तानाकाचे आणि गाडीचे  बरेचसे नुकसान केले. बघून अंगावर काटा उभा राहिला. कंपनीत या घटने बद्दल मी माझ्या सहकार्यांशी चर्चा केली. पण त्याना या विषयात रसच नव्हता. Continue reading