कोणाला निवडावे?

चित्रपटाची सुरवात एका गोड कार्यक्रमाने होते. नायक घरी पोहचतो. नायकाला नायकाच्या वडिलांनी मुलीचे वडील येणार हे सांगण्यात आलेले असते. घरी पोहोचताच, तो मुलीच्या वडिलांसोबत आलेल्या मुलीला आणि इतर नातेवाईकांना पाहून तो चकित होतो. आयुष्यातील त्याचा ‘पाहण्याचा’ पहिला कार्यक्रम असतो. Continue reading

Advertisements

घटस्फोट

खूप आनंद होत आहे. काय करू काय नाही आणि अस झाल आहे. कालच एका स्थळाचा ‘मला’ पाहण्याचा कार्यक्रम झाला. मला ते ‘स्थळ’ पसंत आहे. आणि तिलाही ‘मी’. दोघांची पसंती झालेली आहे. बस काय तो ‘होकार’ येणे बाकी आहे. त्यांचा ‘होकार’ आणि ‘प्रेमपत्र’ आले की, माझ्या सध्याच्या ‘भार्या’ला घटस्फोटाची नोटीस देऊन टाकील. खूप नखरे सहन केले तिचे. आणि विशेषत: तिच्या आईची. जणू काय माझाशी लग्न केले म्हणजे ‘उपकार’ केल्याची भाषा. तशी तिची काय चुकी म्हणा? ‘सासू’बाई. फारच पाडून बोलायच्या. चुका त्या करणार, आणि ‘सॉरी’ मी म्हणायचे. वर्षभर सहन करतो आहे. Continue reading

अस नेहमी का होत?

अस नेहमी का होत, की मित्रांच्या फालतू नखरे सुरु होतात. आणि त्यामुळे मी ज्यावेळी कॅन्टीनमध्ये जात असतो. आणि ती जेवण करून निघालेली असते. अस नेहमी का होत, की मित्राला एखादी मुलगी आवडते. आणि तो तिची माहिती मला शोधायला सांगतो. अस का? नेहमी मला तिची आठवण येते. सगळीकडे तीच दिसते. आणि तीच आवडते. स्वप्नातही मी तिलाच शोधतो. नेहमी अस का होत की, ती समोर आली की माझी गडबड होते. तिच्याशी बोलायची खूप इच्छा होते. पण समोर गेले की सगळ फूस होत. Continue reading

हाय

काल अप्सराने स्वतःहून ‘हाय हेमंत’ म्हटले. किती आनंद झाला म्हणून सांगू! पण मी गाढवासारखा घाई घाईत ‘हाय’ म्हणून सटकलो. काय यार, त्याच ‘हाय’ चाच विचार करत होतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार करावा. आणि तीच गोष्ट आपल्या पुढ्यात यावी, तस झाल अगदी. दिवस खूप छान गेला. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आईने ‘मुलीचे काका आयसीयु आहेत. म्हणून मग जायचे रद्द झाले आहे’. देव पण ना! किती मनातल्या इच्छा पूर्ण करत आहे. खरंच आजकाल मी स्वप्नात आहे की सत्यात तेच कळत नाही आहे. सगळ अगदी मनाप्रमाणे घडते आहे. Continue reading

लग्न

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित. Continue reading

नाही

संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना! Continue reading

अंक दुसरा

रटाळ झालेला विषय ‘स्थळ’. म्हणजे मी तर फार पकून गेलेलो आहे. आजकाल माझ्या डोक्यात कामापेक्षा जास्त विचार या स्थळांचे असतात. आणि आई वडिलांबद्दल तर काही बोलायला नको. ह्याच विषयावर चर्चा माझ्याशी करतात. मध्यंतरी ते गुरुजी आले होते ना! त्यांनी सांगितलेले स्थळ पाहायला परवा आई वडील इथे पुण्यात आले. मला पुण्यातील मला जितकी स्थळ माहिती झाली त्यामधील आता हे दुसरे स्थळ. कारण आई वडिलांच्या फिल्टर मधून पास होणे ९९% शक्यच नसते. त्यातून पुण्यातील एक स्थळ झाले होते. पण त्यांचे ‘हो नाय’. हे दुसरे स्थळाला बघायचा कार्यक्रम ठरला. पण ऐनवेळी त्यांचे बोलावणेच नाही. काय बोलणार आता? Continue reading