मुन्ना बदनाम हुआ..

संपादकांच्या परिषदेत मुन्ना आला. सर्वांना आपली ठरलेली ‘म्याऊ’ स्माईल देत सर्वांना अभिवादन केले. स्वतः खुर्चीवर बसल्यावर स्वतःच्याच हाताने स्वतःलाच चिमटा घेऊन पाहिले. सर्व संपादक अवाक होवून मुन्नाकडे पहात होते. मुन्नाने सर्वांकडे पुन्हा पाहून बसण्याची खुण केली. सर्व संपादक मंडळी खुर्चीत स्थानापन्न झाली. पहिला संपादकाने, ‘पंतप्रधानजी तुम्ही स्वतःचा चिमटा का काढला?’. प्रश्न ऐकताच मुन्नाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. Continue reading

Advertisements

येजा वू

काय करू यार? देवाने माझ्या चित्रपटात तेच तेच सीन का टाकले तेच कळत नाही. बर ह्या विषयावर, मी खूप बोलायचे टाळत होतो. पण आज इतक्यांदा घडलं ना! सकाळी लवकर उठायचे ठरवून देखील आज मी उशिरा उठलो. आधीच खूप गोरा होता. दोन दिवस उन्हात भटकल्यामुळे आणखीन गोरा झालो. लेट मॉर्निंगची बससाठी सुद्धा धावपळ झाली. देवपूजा नाही झाली आज. बस स्टॉप गेलो तर ‘परीवहिनी’. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून रोज कुठे ना कुठे दिसतातच. त्यांना विचारलं ‘बस गेली नाही ना अजून’. तर त्यांनी हसून ‘नाही’ म्हणाल्या. त्या गप्पा मारायच्या रंगात होत्या. असो, मी ‘टाळले’. मग पुन्हा एकदा, त्यांना पहिले तर त्या आपल्या हसरा चेहरा करून माझ्याकडे पहात होत्या. मग हे आधी कुठे तरी पहिले अस वाटायला लागले. बसमध्ये बसल्यावर, मी मुंबईला असतांना हे असल् ‘अर्धवट’, ‘अर्थहीन’ स्वप्न पडलेलं आठवलं. Continue reading

स्वप्न

आज मी स्वप्नात आहे बहुतेक. खरंच स्वप्न की सत्य आहे हेच कळत नाही आहे. काय सकाळ आहे. जाम जबरदस्त. आज सकाळी सकाळी तिने ‘हाय’ केले. काय बोलू यार मी. काहीच सुचत नाही आहे. तीने स्वतःहून ‘हाय’. यार स्वप्नंच तर नाही ना. आणि हे तर काहीच नाही माझ्याशी येऊन गप्पा देखील मारल्या. किती छान आहे ती. सगळ स्वप्नंच वाटत आहे. अस कधी होईल, अशी इच्छा होत होती. सकाळी येतांना तो पडणारा पाऊस, ते थेंब. ते कंपनीच्या बाजूचे हिरवेगार डोंगर आणि त्यावर उतरलेले पांढरे शुभ्र ढग. Continue reading

हाय

काल अप्सराने स्वतःहून ‘हाय हेमंत’ म्हटले. किती आनंद झाला म्हणून सांगू! पण मी गाढवासारखा घाई घाईत ‘हाय’ म्हणून सटकलो. काय यार, त्याच ‘हाय’ चाच विचार करत होतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार करावा. आणि तीच गोष्ट आपल्या पुढ्यात यावी, तस झाल अगदी. दिवस खूप छान गेला. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आईने ‘मुलीचे काका आयसीयु आहेत. म्हणून मग जायचे रद्द झाले आहे’. देव पण ना! किती मनातल्या इच्छा पूर्ण करत आहे. खरंच आजकाल मी स्वप्नात आहे की सत्यात तेच कळत नाही आहे. सगळ अगदी मनाप्रमाणे घडते आहे. Continue reading

पंतप्रधानांची विशेष मुलाखत

नमस्कार पंतप्रधान साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तर मग आपण मुलाखत सुरु करूयात का?
पंतप्रधान– सोनियांना विचारलंस ना?
मी– हो, त्या हो म्हणाल्यात!
पंतप्रधान– (एक मोठा उसासा घेत..) मग कर की सुरु! जो बोले सो निहाल. अरे हो, निहालभाई काय म्हणाले माझ्याबद्दल??
मी– आपण ते मुलाखती नंतर बोलले तर चालेल?
पंतप्रधान– बर. Continue reading

परीस्पर्श

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर आतमधील लोकांनी मला ही मुख्य इमारतीची बस आहे असे सांगितले. मी आणि ती खाली उतरत असतांना चुकून माझा आणि तिचा ‘स्पर्श’. Continue reading

संकेत

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी रागात त्याला ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणतो. अस एक स्वप्न पडले होते. Continue reading