१००

आज फ्लूने शतक केल पुण्यात. आता सचिनने देखील केल म्हणा. कदाचित शंभर म्हटलं की क्रिकेटच आठवेल. पण पुण्यात सावळा गोंधळ चालू आहे. आता मी काही त्या हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांचा प्रतिनिधी नाही, की ‘फ्लू का आतंक’ म्हणायला. पण सुरवात आणि शतक पुण्यातच घडल. मुळात त्या स्वाइन फ्लू बद्दल काय बोलाव तेच कळत नाही. ना त्यावर योग्य उपाय ना लोकात जागरुकता. प्रत्येक जण तोंडाला रुमाल बांधून फिरतो. पण रुमाल बांधल्याने फ्लू होणारच नाही अस नाही. सरकारला तर काही बोलून फायदाच नाही. पालिका फ़क़्त आम्ही हे केल आणि ते केल्याच्या गप्पा. निष्पन्न काहीच नाही. लोक आपली मरतच आहे. बर गेलेल्यांपैकी काही कधीही घराबाहेर न पडलेल्या आहेत. Continue reading

Advertisements

चिल्लर पार्टी

संध्याकाळी घरी येताना रस्त्याच्या बाजूला एक बाई उभी होती. तिने एका छोट्याशा बाळाला बरोबर घेतलं होत. ते बाळ बहुतेक नवीनच चालायला शिकलं होत. अगदी मस्त, ‘गोर गोर पान फुलासारखं छान’. त्याची आई त्याला विचारात होती ‘कुठे जायचं?’. मी त्याला बघत चाललो होतो. त्याने माझ्याकडे बोट केले. बघून खूप हसू आले. मध्यंतरी मी माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलो होतो. आता तिचा मुलगा तीन वर्षाचा. पण त्याच्या वर्तनाने वाटणार नाही. त्याने मला त्याच्या खोलीतील संगणक कसा चालू करायचा ते सांगितले. नंतर गेमची सीडी कशी टाकायची आणि त्याचे ते रंग भरण्याचे खेळ कसे खेळायचे हे दाखवले. बर त्याच असं, मी एक गेम खेळणार आणि मग तू एक गेम खेळायलाच हवा. मग काय ते रंग भरण्याचे खेळ मलाही त्याने खेळायला लावले. Continue reading

नवीनपणा काहीच नाही

मागील काही दिवसांपासून नवीन काही घडतच नाही आहे. तीच सकाळ, तीच लोकल, तीच कंपनी, तेच काम. सगळ्या गोष्टीत तोच तोचपणा आलेला आहे. काही नवीन घडतच नाही आहे. दिवसाचा एक असा ठरलेला दिनक्रम (साचा) बनून गेला आहे. लोकल – कंपनी – घर. बस हेच सगळ. वर्तमानपत्रात त्याच त्याच बातम्या. कंपनीत येताना आणि घरी जाताना नेहमी मी काही तरी नवीन घडल अशी अपेक्षा करतो. पण काही नवीन घडत नाही. सकाळी उठून आवरा, लोकल पकडा, कंपनीत जाऊन तेच काम करा. घरी येऊन तेच. वर्तमानपत्रात काही नवीन बातम्या नाही. टीव्हीचे कार्यक्रम तेच. वर्डप्रेसवर पण त्याच पद्धतीच्या नोंदी. बर ज्यांच्या बोलण्याने पान देखील हलत नाही. अशी लोक देशपातळीच्या विषयावर आपली मत मांडतात. राष्ट्रीय नेते मूर्ख म्हणतात.

Continue reading

पुण्यात काहीही घडू शकते

पुण्यात काल दोन बांगलादेशींना अटक झाली. दोघेही आठवी नापास. एकाच नाव अब्दुल हक आणि दुसरा मामून रैफ. घुसखोरी करून ते प्रथम मुंबईत आले. मामून रैफ १९९५ तर अब्दुल २००३ मध्ये भारतात आले. पुण्यात एका मोठ्या कंपनीत अब्दुल हक प्रोजेक्ट इन्चार्ज, त्याचा पगार एक लाख वीस हजार. तो देखील महिन्याचा. आणि मामून रैफ ला वीस हजार महिन्याचा पगार. त्यांनी बरेच पैसे कमावले. इथे लग्नही झाली. त्यातला अब्दुला वानवडीला तर मामून रैफ हिंजवडीला राहायला होता. त्यांनी शाळा सोडल्याचा खोटा दाखल्यापासून ते खोट्या पासपोर्ट पर्यंत सगळ जमवलं. आता पकडले गेले. पण पुण्यात काहीही घडू शकते. Continue reading

मानमोड्या नव्हे झोपमोड्या

आजचा दिवस फारच क्लेशदायक गेला. म्हणजे करायला गेलो गणपती आणि झाला मारुती, त्यातली गत. कंपनीतुन घरी आलो. आणि थोडा वेळ होतो ते लाइट गेली. पुणेरी भाषेत दिवे गेले. मी ज्या भागात राहतो त्या तिथे अस नेहमी घडते. भागाच नाव बिजलीनगर आहे. नावातच केवळ ‘बिजली’ आहे. प्रत्यक्षात अनेक वेळा वीज नसते. वीज नसल्याने मला काही काम करता येणे शक्य नव्हते म्हणुन मी बाहेर माझ्या नव्या शेजर्याशी गप्पा मारत बसलो होतो. तो आहे जळगावचा . जळगावाकरांची मराठी म्हणजे रसाळ, एक लय आणि लाघव. स्वाइन फ्लू वरुन बोलता बोलता विषय निघाला मान मानमोड्याचा. Continue reading

पुण्यात स्वाइन फ्लू पेक्षाही घातक मास्क फ्लू

आज सकाळी ९ ची लोकल हुकली. बसने गेलो. कंपनीत आल्या आल्या माझ्या काही सहकारी मैत्रिणी मला विचारू लागल्या की, तू रोज लोकल ने येतो ना? मग मास्क घेतला का? मी म्हटल की लोकलने येतो परंतु मास्क घेतला नाही. झाल त्याना जणू काही भुत बघितल्या सारखेच माझ्याकडे बघू लागल्या. मला म्हणाल्या की, तू घे नाही तर आम्हालाही होइल. एकून डोकाच सरकल. मी त्याना सरळ सांगितल की अस वाटत असेल तर माझ्यापासून दूर रहात जा. बर संगणक चालू करतो तोच माझा एक दोस्तने जी टॉक वर मला तोच प्रश्न की मास्क घेतल का? आधीच या प्रश्नाने डोक सरकवल होत त्यात हा. त्याला म्हटल की नाही घेतला, आणि घेइल की नाही त्याचा अजुन विचार केलेला नाही. कदाचित त्याला समजल असाव. तो फक्त अस म्हणाला की, घेतल नाही तरी काही बिघडत नाही परंतु काळजी घे. Continue reading

पुण्यातील स्वाइन फ्लू

स्वाइन फ्लू ने पूणेकरांची झोपच उडवली आहे. सिंबायोसिस कॉलेजच्या सेनापती बापट रोड कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एका विद्याथिर्नीला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचा अहवाल आल्यामुळे हा कॅम्पस १३ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रिय स्वाश स्पर्धा पुढे ढकलंन्यात आली आहे. अनेक शाळा पुढे हाच प्रश्न उभा ठाकला आहे. मास्क घेउन कितपत फायदा होइल याची काही कल्पना नाही. एकुणच परिस्थिती काही चांगली नाही. कोणी नुसता शिंकला तरी लोक त्याच्याकडे भीतीने बघतात. रस्त्यावरून चालताना मास्क घातलेले लोक बघितले की जैन लोकांची फेरी निघाली आहे की काय अशी शंका येते. Continue reading