हिंदू अतिरेकी

आज रात्री गच्चीतून फटाके बघताना खूप मजा वाटत होती. काकाच्या मोबाईलचा रिचार्ज आणायाला जाताना काही विचारायलाच नको, कुठे कधी फटका फुटेल काही सांगता येत नव्हते. दोन मिनिटांच्या रस्त्याला दहा मिनिटे लागली. अस वाटत होत की कुठे तरी युद्ध भूमीवरून जातो आहे की काय. चिल्लर पार्टी फारच जोरात होती. परत घरी आल्यावर टीव्हीवर गोवा बॉम्बस्फोटाची बातमी बघितली. ऐन दिवाळीच्या सुरवातीला झालेला बॉम्बस्फोट. आज काही जणांना पकडलं आहे. ते सनातन संस्थेशी सहभाग आहे अस म्हटलं आहे. बघून खरचं खूप छान वाटल. नरक चतुर्दशीचा मुहूर्त फार छान निवडला. निदान आपल्या देशात, आता तो आपला कशावरून हा देखील एक प्रश्नच आहे. नाही मी राजकारणाचा विषय काढत नाही आहे. पण मला तुम्ही सांगा आपला देश सर्वधर्म समभाव बाळगणारा आहे ना. जर हज यात्रेला जाणार्याचा खर्च आपला देश उचलतो. मग अमरनाथला जाताना स्टैंप पेपरवर अस का लिहून द्याव लागत की ‘तिथे जाताना होणाऱ्या अपघात, मृत्यूला फ़क़्त मीच(यात्रेकरू) जबाबदार आहे’. Continue reading

Advertisements

कुठे आहे राज ठाकरे?

आज दुपारी रायपूरमध्ये मराठी मुलांना मारहाणीची बातमी वाचली. वाचून डोकच फिरलं. थोडा वेळ काय करू आणि काय नको अस झाल होत. माझ्या काही मित्रांना ती बातमी दाखवली. त्याचं पण डोक सरकल असाव. त्यावर ते मला म्हणाले की ‘आता कुठे आहे राज ठाकरे?’. त्यांना म्हणालो की ‘राज ठाकरेंनी काय ठेका घेतला आहे का मराठी माणसाचा?’ काही झाल की ‘कुठे आहे राज ठाकरे?’. मग त्यांना म्हणालो की ‘आता का काही बोलत नाहीत?, ठाण्यात परप्रांतीयांना ठोकलं तर, राज गुंड. आणि ते परप्रांतीय कसे पापभिरू ह्याचे प्रवचन ऐकवलं होत. आता ते चुकीचे होते तर आता हे चुकीच नाही का?’ मग कुठे काही म्हणतात. Continue reading

स्वातंत्र्य आणि वीर सावरकर

आज संध्याकाळी सह्याद्री वाहिनीवर ‘वीर सावरकर’ हा चित्रपट पहिला. वा! खरच खुप छान चित्रपट. असे चित्रपट दाखवले तर का कोण लोक नाव ठेवतील सह्याद्रिला. असो, सावरकरना स्वातंत्र्यवीर असे का म्हणतात ते आज कळले. खरच खुप त्रास सहन केला त्यानी. त्यानी केलेली हिंदू या शब्दाची व्याख्या अगदी योग्य आहे. आपण उगाचच अहिंसा आणि सर्वधर्म समभावाचे गोडवे गातो. आता कालचा घ्या ना. काल १४ अगस्त, पूणेस्टेशन मधे एक पीर आहे. कोण संत आहे ते काही माहिती नाही. परंतु आहे. काल मी बघितले की पिराच्या बाजूला एक मोठा मंडप टाकला होता. आणि काही तरी न समजेल अशी गाणी लागलेली होती. बर त्यात काही मला चुकीच वाटल नाही. परंतु तिथे एक हिरवा रंग असलेला आणि त्यावर चांदनी अशा झेंडा फडकत होता. चोकोन एवजी आयताकृति केला तर पाक चा शोभेल असा. Continue reading

राष्ट्रपति बाई काय म्हणाल्या?

आज सह्याद्री वाहिनी वर राष्ट्रपति बाई चे भाषांतर केलेले स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला केलेले भाषण ऐकायला भेटले. खर तर ते सगळ भाषण मी जसच्या तस ‘हेमंतमत‘ मधे टाकल आहे. आपल्या देशाच्या पहिल्या नागरिक काय म्हणाल्या याचा संक्षिप्त स्वरूपात सांगतो. ताई म्हणाल्या ‘देशात हवामान सध्याला चांगले नसल्याने आणि स्वाइन फ्लू ची साथ आली असल्याने नागरिकांनी सरकारला मदत करायला हवी.’ ‘प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये प्रत्येकाने शिस्तिचे पालन करायला हवे, हीच देशाची संपत्ति आहे.’ ‘देश विकसित होतो आहे. सरकारच्या धोराणाने आपण केलेल्या सतत परिश्रमाने आपला देश जागतिक स्तरावर आपले स्थान निशित करू शकला आहे.’ Continue reading

नितेश राणे यांचा स्वाभिमान

२ ऑगस्टला पुण्यात स्वाभिमान संघटनेच्या ३१ शाखांचे उद्घाटन झाले. मी कुठे कधी उद्घाटन झाले हे मला कळले  नाही. पण ठिकठिकाणी लावलेली भित्तिपत्रके बघून समजले. आज माझा बोपोडी मधील मित्र सांगत होता की आमच्या इथे नितेश राणे आला होता. तो म्हणाला त्याचा आवाज, बोलण्याची पद्धत अगदी नारायण राणे सारखी आहे. नितेश राणे काय म्हटला अस मी माझ्या मित्राला विचारल तर तो बोलला की ‘तुम्ही कोठेही आणि काहीही करा तुमच्यावर केस होणार नाही’. Continue reading