शिवरायांचा इतिहास २०२०

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता कधी झाला याची तारीख राज्यशासन ठरवेल त्या तारखेला झाला अस मानायला काही हरकत नाही. त्यांची आई जिजाबाई. त्यांचे वडील शहाजी राजे. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले. त्यांना दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी, तुकाराम महाराज या सर्व टीचर्स ने शिकवले. पण यातील कोणीच त्यांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी स्वराज्याची’ स्थापना केली. आणि स्वराज्याची पताका म्हणून तिरंग्याची निवड केली. शिवरायांनी एकामागून एक असे अनेक किल्ले जिंकून स्वराज्य चौफेर पसरले. परंतु शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते. अगदी महात्मा गांधी प्रमाणे. शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आदिलशहाला डोळ्यात खुपणारा होता. म्हणून आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले. Continue reading

चार स्तंभ

शाळेत नागरिक शास्त्रात ‘लोकशाहीला म्हणे तीन स्तंभ असतात’ अस होत. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि जो मान्यताप्राप्त नसलेला पण आहे असा चौथा माध्यमे. पण वाटतं का यापैकी कोणी आहे? सगळेच ‘स्तंभ’ आहे की पोटापाण्याचा धंदा? याच उत्तर शेंबड पोरगही देईल. लोकसभा ज्याला हिंदीत ‘संसद’ म्हणतात. मागील महिन्यात बिनबोभाट एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि त्याने आमच्या सर्व खासदारांचे वेतन सोळा हजारावरून ऐशीं हजार झाले. कोणत्याही खासदाराला काहीच वाटले नाही. आणि कोणताही खासदार या विरोधात काही बोलला देखील नाही. आणि ना कोणता पक्ष या विरोधात गेला. हा आहे आपल्या लोकशाहीचा पहिला स्तंभ, ज्यावर आपली लोकशाही टिकली आहे. Continue reading

आम्ही पुणेकर

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. Continue reading

रांग

काय बोलाव आता ‘रांग’ बद्दल. जीवनातील एक अपरिहार्य गोष्टच झाली आहे. बसचे रिझर्वेशन, बसमध्ये बसण्यासाठी, कॅन्टीनमध्ये जेवण घेण्यासाठी, अगदी सार्वजनिक स्वछगृहात देखील रांगच. त्या कसाब आणि गुरूची फाशी देखील रांगेत. परवा पुणे स्टेशनमध्ये रात्री दहावाजून दहा मिनिटांची लोणावळा लोकलच्या तिकिटासाठी तिकीट खिडकी समोर उभी असलेल्या रांगेत उभा राहिलो. मोबाईलमध्ये वेळ बघितली तर नऊ पंचेचाळीस झाले होते. आणि रांगही फार मोठी नव्हती. असतील वीस एक माणसे. नेहमी प्रमाणे मध्येच घुसून तिकिटे काढणारे देखील कमी नव्हते. कोणी घुसायला लागला की रांगेत असलेले लोक हिंदीतून त्याला घाण शिव्या द्यायचे. ऐकायलाही खूप किळस यायची. पण रांगेत घुसणारे काही ऐकत नसायचे. दहा वाजता मी ज्या खिडकीसमोर उभा होतो. ती खडकी बंद झाली. आणि दुसर्या बाजूची खिडकी उघडली. Continue reading

संकल्प

काही बोलण्याआधी सर्वांना ‘मराठी नववर्षाच्या’ हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हे वर्ष सुखाचं आणि विकासाच जावो. आज म्हटलं, मागील वर्षाचा माझा हिशोब द्यावा. मागील वर्षात बऱ्याच गोष्टी घडल्या. मी दोन खोल्यांच एक घर घेतलं. मोठ्या कंपनीत नोकरी. उत्पन्नात वाढ. घरासाठी काही वस्तू खरेदी केल्या. त्याआधीच्या वर्षाच्या मानाने ५.४७% मिळकतीत वाढ झाली. खर्चाचा हिशेबात मात्र मागील वर्ष खरंच खूप वाईट अवस्था झाली आहे. मागीलवर्षी झालेला खर्च त्याधीच्या वर्षाच्या मानाने २९७% वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी बचत एकूण उत्पन्नाच्या २/३ अशा प्रमाणात होती. आणि मागील वर्षी बचत १.२/१० म्हणजेच उत्पन्नाच्या १२% एवढी होती. बाकीचा ८८% खर्च. मागीलवर्षी एक चांगली गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याचे हाल कमी झाले. एकूण वर्षात १५% खर्च खाण्यावर आणि ७३% खर्च इतर गोष्टींवर आणि १२% शिल्लक. इतर खर्चात मी माझा प्रवास खर्च, कपडे, इतर सामान अशा गोष्टी टाकतो. थोडक्यात खाण्यावर न केलेला खर्च म्हणजे इतर खर्च. तस म्हणाल तर मी मागीलवर्षी काहीच फालतू खर्च केला नव्हता. पण खर्च २९७% वाढला. स्पष्टपणे बोलायचं झालं. तर माझा खर्च याधीच्या खर्चापेक्षा सव्वा लाखाने वाढला आहे. Continue reading

जय हो भोसरीकर

भोसरी नाशिक-पुणे महामार्गावरील एक उपनगर. दुपारची वेळ. एका सराफाच्या दुकान लुटण्याच्या उद्येशाने दोन मोटारसायकलीवर चार चोर आले. चौघांच्या डोक्यावर हेल्मेट होते. त्यातले दोघे दुकानात शिरले. दोघांनी हेल्मेट काढून ठेवले. आणि दुकान मालकावर पिस्तुल रोखून हिंदीत ‘हलू नका’ असा दम भरला. एकाने मालकावर पिस्तुल रोखले तर दुसऱ्याने काउंटरच्या बाजूने जाऊन एका पोत्यात सोन्याचे दागिने भरले. चोर दुकानाच्या बाहेर आले. मालक आणि त्याचा नोकर त्या चोरांच्या मागे धावत आले. नोकराने चोराच्या पाठीत बुक्के मारले. त्याला प्रत्युतर म्हणून मोटारसायकलीवर बसलेल्या एकाने मालकावर पिस्तुलीच्या गोळ्या झाडल्या. मालकाच्या पायात आणि पाठीत अशा दोन गोळ्या लागल्या. Continue reading

पी जे

एक महिन्यापासून रोज दर दहा मिनिटांनी ‘आप सुन रहें है पुणे का नंबर वन…’ ‘और मै हू..’. ऐकतो आहे. त्या एफ एम वर चांगली गाणी चालू असतात. आणि हे मधेच ‘बजाते रहो’ नाही तर ‘बल्ले बल्ले’ अस काहीस वाक्य घुसडतात. आणि गाण्याचा आस्वाद घेत असताना हे मधेच काही तरी पांचट जोक मारतात. हसू येण्याऐवजी राग येतो. त्यात तो ‘घंटा सिंग’. त्याच्या फोनपेक्षा मोबाईल कंपन्यांचे जाहिरात परवडली. इतकी तरी डोकेदुखी होत नाही. हे आर जे कुठून पकडून आणतात देव जाणे. मधेच मराठी आणि मधेच हिंदी. निदान एका भाषेत बोला. पण गाणी हिंदी. गाणे चालू असताना मधेच ‘हाये..’ आता हे काय? बर तो त्यांचा टाईमचेक पण अनेक वेळा चुकीचा. त्यात लवगुरु बद्दल काही विचारूच नका. सगळ्यांना एकच सल्ला ‘तिचा सरळ विचार, नाही म्हणाली तर दुसरी’. ‘क्या आप व्हर्जिन है? अगर हो तो मुझे कॉल करो और जितो..’ बर अस म्हणणारी एखादी मुलगी आर जे. Continue reading